आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पाय घसरून आजीचा मृत्यू झाल्याचा नातवाचा बनाव उघड

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 3, 2022

मार्केटयार्ड पोलिसांत गुन्हा : आजीला गरम तेलावर ढकलून देत केली होती मारहाण

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : शिळ्या भाजीवरुन झालेल्या वादातून नातवाने आजीला गरम तेलावर ढकलून देत मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना पुण्यातील मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर, येथे बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. आजीच्या मृत्यूनंतर नातवाने आजी घसरुन पडल्याचा बनाव रचला मात्र तपासात नातवाने खून केल्याचे समोर आले. मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करुन आरोपीला ताब्यात घेतले आहे.

मथुराबाई पांडुरंग कोळेकर (वय 72, रा. आंबेडकरनगर वसाहत, मार्केटयार्ड) असे खून झालेल्या आजीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी लक्ष्मण बाबु पांढरे (वय 24) याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत नातवाने केलेल्या मारहाणीत आजीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी लक्ष्मण हा मथुराबाईच्या मुलीचा मुलगा आहे. तो एका ठिकाणी ड्रायव्हर म्हणून काम करतो. त्याला दारु पिण्याचे व्यसन असून, तो नेहमी दारु पिऊन घरी येत होता. दारु पिल्यानंतर तो नेहमीच आजी सोबत भांडण उकरून काढत होता. बुधवारी साडेबाराच्या सुमारास जेवणात त्याला पाहिजे असलेली भाजी नसल्याच्या कारणावरुन आजीसोबत वाद घातले. यावेळी त्याने आजीला जोरदार आपटले आणि मारहाण केली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. आजीचा मृत्यू झाल्याचे समजताच लक्ष्मण घराला कुलूप लावून निघून गेला. दुपारी साडेतीनच्या सुमारास पुन्हा घरी आला दरवाजा उघडला. त्यावेळी शेजाऱ्यांनी आजी बाहेर कशी आली नाही म्हणून पाहण्याचा प्रयत्न केला त्यावेळी शेजाऱ्यांना आजी मृत अवस्थेत पडल्याची दिसून आली. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. त्यावेळी आरोपी पळून गेला होता.

घटनेची माहिती मिळताच मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी लक्ष्मणची माहिती घेतली असता तो मार्केटयार्ड परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. यानंतर पथकाने लक्ष्मण याला पळून जाताना पीएमपीएमएल बस स्थानकाजवळ पकडले. पोलिसांनी लक्ष्मणकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

get_footer();