आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळक्यांना पोलिसांनी केले गजाआड

maharashtra jain warta • News Slider, Police • July 15, 2021

गुन्हे शाखा युनीट 1 पथकाची कामगिरी

पुणे : संकेत डुंगरवाल
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुण्यात मंगळवार पेठेतील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारे निखिल दत्ता थोरात (वय 24), रवी ज्ञानेश्वर बोत्रे (वय 24), किरण ज्ञानेश्वर बोत्रे (वय 22), अविनाश राजेंद्र कांबळे (वय 22), राहुल म्हसू शिंदे (वय 24) या पाच जणांच्या टोळक्यांना गुन्हे शाखा युनीट 1 पथकाच्या गजाआड केले आहे. त्यांच्याकडून 2 कोयते, 5 मोबाईल, दुचाकी व रोख रक्कम असा एकूण 4 लाख 82 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनीट 1चे पथक हद्दित सराईत व पाहिजे आरोपींचा शोध घेत असतांना पोलीस अंमलदार अजय थोरात यांना मंगळवार पेठेतील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी काही इसम येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकच्या एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी व स्टाफ यांनी मंगळवार पेठे परिसरात जाऊन त्याठिकाणी सापळा रचून एका टॅंकरच्या आडबाजूला दबा धरून बसलेल्या पाजण्याच्या टोळक्यांना शिताफीने ताब्यात घेत त्यांचे अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून दोन कोयते 5 मोबाइल असा मुद्देमाल हस्तगत केला. त्यांची तपासकामी चौकशी केली असता तपासात आरोपींनी फरासखाना, लोणीकंद, हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडुन 4 एलसीडी, लॅपटॉप, इस्त्री, बूट, रोख रक्कम असा एकूण 4 लाख 82 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ताब्यात घेतलेले आरोपी सराईत गुन्हेगार गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने ताब्यात घेतलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात चतु:शृंगी, चंदनगर, भारती विद्यापीठ, कोथरुड, उत्तमनगर, हिंजवडी, परांडा, नळदुर्ग, या पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामधील सराईत गुन्हेगार निखिल दत्ता थोरात आणि किरण ज्ञानेश्वर धोत्रे हे दोघे आरोपी हिंजवडी पोलिस ठाण्यामधील दाखल गुन्ह्यात 2019 पासून फरार असल्याचे माहिती मिळाली. या सर्व आरोपीच्या विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सदरचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड करीत आहेत.

ही कामगिरी, वरिष्ठ निरीक्षक सुनील ताकवले, उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, पोलीस कर्मचारी अजय थोरात, इमरान शेख, अय्याज दड्डीकर, शशिकांत दरेकर, प्रशांत गायकवाड, तुषार माळवदकर, महेश बामगुडे, सतीश भालेकर, अशोक माने, योगेश जगताप, सचिन जाधव, दत्ता सोनवणे यांनी केली आहे.

get_footer();