आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पिस्टल बाळगणारा पुणे पोलिसांच्या जाळ्यात

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 11, 2021

मार्केटयार्ड पोलिसांची कारवाई : पिस्टल व 2 काडतुसे जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला मार्केटयार्ड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बैलबाजार समोरील सार्वजनिक शौचालयाच्या मागे मंगळवारी (दि.7) करण्यात आली. आरोपीकडून पिस्टल आणि दोन जीवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहे.
सुरज राकेश शुक्ला (वय-19 रा. धायरी गारमळा, धायरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी बंडगार्डन पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे कर्मचारी अनिस शेख व संदिप घुले यांना सूत्रांकडून मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बैलबाजार येथील सार्वजनिक शौचालयाच्या मागे एक तरुण उभा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए. व्ही. देशपांडे आणि पोलीस निरीक्षक गुन्हे सविता ढमढेरे यांना कळवण्यात आली. दरम्यान, मिळालेल्या माहितीच्या आधारे मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील तपास पथकाने आंबेडकरनगर येथील बैलबाजार परिसरात सापळा रचून सुरज शुक्ला याला ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला पिस्टल व दोन काडतुसे सापडली. पोलिसांनी पिस्टल आणि काडतुसे जप्त करुन त्याच्याकडे सखोल चौकशी केली. त्यावेळी पिस्टल माझेच असल्याची माहिती पोलिसांना दिली. आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम करीत आहेत.

अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील,सहायक पोलीस आयुक्त गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.व्ही. देशपांडे, पोलीस निरीक्षक गुन्हे सविता ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम, पोलीस हवालदार हिरवळे, किरण जाधव,पोलीस अंमलदार संदिप घुले, स्वप्नील कदम, आशिष यादव, प्रशांत मुसळे, विक्रम पाटील, अनिरुद्ध गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();