आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पिस्तुल बाळगणाऱ्यास जेरबंद करीत पिस्तुल दोन काडतुसे केली जप्त

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 9, 2021

गुन्हे शाखेच्या युनिट-६ची कारवाई : भवानी पेठेतील वॉचमेकर चाळीत केले अटक

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : रॉबरी टाकण्यासाठी पिस्तुल बाळगणाऱ्यास गुन्हे शाखेच्या युनिट-६च्या पथकाने जेरबंद केले. भवानी पेठेतील वॉचमेकर चाळीमध्ये कारवाई करीत त्याच्याकडून एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली.

समीर प्रकाश कोतवाल (वय ३४, रा. वॉचमेकर चाळ, भवानी पेठ, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. समर्थ पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट-६चे पथक गस्त करत असताना भवानी पेठेतील वॉचमेकर चाळ येथे रॉबरी करण्याकरिता पिस्टल आणल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार घटनास्थळी धाव घेत सापळा रचून आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून एक पिस्टल, दोन जिवंत काडतुसे हस्तगत केले. यावेळी तपासात त्याने रॉबरी करण्याकरिता पिस्तुल आणल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्यावर समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहायुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट-६चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर टेंगले, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विट्ठल खेडकर, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();