आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पीएमपी बसमध्ये दोघांच्या खिशावर चोरट्यांचा डल्ला

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 27, 2022

चंदननगर पोलिसांत फिर्याद : वाघोली-खराडी बायपास दरम्यान झाली चोरी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पीएमपी बसमध्ये दोन प्रवाशांचा खिसा कापून सोळा हजार रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला. वाघोली-खराडी बायपास दरम्यान २५ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० ते १०.२० च्या सुमारास चोरट्यांनी गर्दीमध्ये डाव साधला.

नंदकुमार शिंदे (वय ५२, रा. मु.पो. राहू, ता. दौंड, जि. पुणे) यांनी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी वाघोली ते पुणे स्टेशन दरम्यान पीएमपी बसने प्रवास करीत असताना वाघोली ते खराडी बायपास बसथांब्या दरम्यान चोरट्याने खिशातील दहा हजार रुपये आणि त्यांचे साथीदार भगवान राठोड (रा. चंदननगर, पुणे) यांच्या खिशातील सहा हजार रुपये असा एकूण सोळा हजार रुपयांवर डल्ला मारला. चंदननगर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार आर. एस. लोहकरे पुढील तपास करीत आहेत.

get_footer();