आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पोलीस भरती परीक्षेवेळी बसविला मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 20, 2021
Sept 2021 Issue16
Spread the love

पोलिसांमुळे ‘मुन्नाभाई’चा प्लान फसला : आरोपीने परीक्षा केंद्रावून पळ काढला

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस शिपाई पदासाठी शुक्रवारी (दि. १९ नोव्हेंबर २०२१) 790 जागांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. पोलीस भरतीची परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी व गैरप्रकार रोखण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त, व्हिडिओ शूटिंग व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भरारी पथके नेमण्यात आली होती. मात्र हिंजवडी येथील परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका ‘मुन्नाभाई’चा प्लान फसला. आरोपीने पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी चक्क मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस बसवले होते.

शहरातील 80 केंद्रावर परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. दुपारी हिंजवडी येथील केंद्रावर उमेदवारांची तपासणी सुरु होती. त्यावेळी आरोपी उमेदवाराच्या मास्कचे वजन जास्त असल्याचे एका पोलिसाच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने मास्कची बारकाईने पाहणी केली असता आतमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस बसवल्याचे समोर आले. त्यामध्ये एक सिमकार्ड मिळून आले आहे. पकडले गेल्यानंतर आरोपीने परीक्षा केंद्रावरुन पळ काढला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

18 11 2021 news 10
get_footer();