आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पोलीस आल्याचे पाहताच चोरट्यांनी काढला पळ

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 13, 2021

कोंढवा पोलिसांत गुन्हा : महंमदवाडीमधील मार्गोसा सोसायटीसमोर घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : महंमदवाडीमधील मार्गोसा हाइट सोसायटीसमोरून मोटारसायकलवरून जात असताना तिघांनी कोयत्याच्या धाकाने जीवे मारण्याची धमकी देऊन मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी तेथे पोलीस आल्याचे दिसताच चोरट्यांनी तेथून पळ काढला. ही घटना शुक्रवारी (दि. १० डिसेंबर) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

हातीम फ्रेमवाला (वय ४३, रा. कोंढवा, पुणे) यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार तिघा अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, हातीम फ्रेमवाला महंमदवाडीतील मार्गोसा हाइट सोसायटीसमोरील रोडवरून मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी तिघाजणांनी मोटारसायकल आडवी घालून कोयत्याच्या धाकाने जीवे मारण्याची धमकी देत मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्यावेळी तेथून पोलीस आल्याचे पाहून चोरट्यांनी पळ काढला.

get_footer();