आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पोलिसांनी अपहृत मुलीचा तातडीने घेतला शोध

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 19, 2021

दोन-तीन दिवसांपासून होती बेपत्ता : हडपसर पोलिसांच्या वतीने आई-वडिलांकडे केले सुपूर्द

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : बंडगार्डन पोलिसांनी हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील अपहृत अल्पवयीन मुलीचा तातडीने शोध घेऊन तिला हडपसर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले. दोन-तीन दिवसांपासून ती बेपत्ता होती. बंडगार्डन पोलिसांनी तातडीने शोध घेऊन हडपसर पोलिसांकडे दिले. त्यानंतर हडपसर पोलिसांनी अल्पवयीन मुलीला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले.

पोलिसांनी सांगितले की, १७ नोव्हेंबर २०२१ रोजी अकराच्या सुमारास ताडीवाला रोड भागातील पाच बिल्डिंग परिसरात हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतून अपहृत झालेली अल्पवयीन मुलगी येणार असल्याची सूत्रांकडून ताडीवाला पोलीस चौकीचे प्रभारी अधिकाऱ्यांना माहिती मिळाली. त्यांनी तातडीने तपासाची सूत्र हलविली आणि ताडीवाला रोड परिसरात शोध सुरू केला.

त्यांना दत्त मंदिराच्या भागात एक मुलगी व मुलगा बॅग घेऊन संशयास्पद दिसले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, त्यांनी दोन-तीन दिवसांपासून राहत्या घरातून पळून आल्याचे सांगितले. त्या दोघांना ताडीवाला पोलीस चौकीत आणून हडपसर पोलीस स्टेशन येथे सदर मुलीबाबत चौकशी केली. तेव्हा हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि.नं.९८१-२०२१ भादवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे समजले. पोलिसांनी लागलीच त्या दोघांना हडपसर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आणि पोलिसांनी मुलीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले.

सहायक पोलीस निरीक्षक विनायक कोळी, पोलीस हवालदार मोमीन, पोलीस अंमलदार प्रकाश सावंत, राजेंद्र शिंदे, शरद वाघमारे यांच्या पथकाने ही उत्तम कामगिरी केली.

get_footer();