आवृत्ती पुणे
← Back to Homepage

प्रशांत बडगिरेकडून पेपर विकत घेणारे दोघे जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 11, 2021

पुणे सायबर पोलिसांची कारवाई : आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरण

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी अजून दोन जणांना अटक केली आहे. लातूर सार्वजनिक आरोग्य विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरेने ज्यांना पेपर दिले होते. त्या दोघांना पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांना बीड आणि उस्मानाबाद येथून शुक्रवारी बाराच्या सुमारास अटक केली आहे.

नामदेव विक्रम करांडे (वय-33 रा. रो हाऊस नं.3, अष्टविनायक कॉलनी, कॅनल रोड, गयानगर, बीड), उमेश वसंत मोहीते (वय-24 रा. कोताळ, पो. बलसूर, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. विक्रम करांडे याने बडगिरे याला 8 लाख रुपये दिले होते. तर उमेश मोहिते याने 5 लाख ठरवून 2 लाख दिल्याचे उघड झाले आहे.

काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाचा पेपर आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनीच इतरांच्या मदतीने फोडल्याचे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले होते. बडगिरेने ज्यांना पैसे घेऊ न पेपर दिले होते त्या दोघांना अटक करण्यात आली आहे. पेपरफुटी प्रकरणी राज्यातून अटक केलेल्यांची संख्या आता 14 वर पोहचली आहे. आरोपींना पोलीस उपनिरीक्षक डफळ, पोलीस अंमलदार अनिल पुंडलीक, अश्विन कुमकर, चालक सुनिल सोनोने यांच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();