आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सोरतापवाडीतील हातभट्टीचे उच्चाटण

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 22, 2021

लोणी काळभोर पोलिसांची कारवाई : आठ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध सुरू असलेल्या हातभट्टी दारूअड्ड्याचे लोणी काळभोर पोलिसांनी उच्चाटन करत, एकूण आठ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला.

सोरतापवाडी (ता. हवेली) हद्दीमध्ये जयश्री कांतीलाल राठोड (रा. सोरतापवाडी, ता. हवेली, जि. पुणे) ही महिला हातभट्टी दारू तयार करीत असल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांना सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत छापा टाकला. त्यावेळी तेथे एक महिला व एक पुरुष दगडी चुल्हणावर लोखंडी बॅरेलमध्ये कच्चे रसायन ओतीत होते. मात्र, पोलिसांचा सुगावा लागताच त्यांनी तेथून पळ काढला.

दरम्यान, पोलिसांनी तीन लोखंडी बॅरल, एक प्लास्टिक बॅरल, एक प्लास्टिकचे कॅन्ड, लाकडी सरपण सुमारे २०० किलो व अंदाजे ५०० लिटर कच्चे रसायन व ३० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू असा एकूण आठ हजार ८०० रुपये किमतीचा माल जागीच नष्ट केला.

ही कारवाई, अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक सुभाष काळे, सहायक पोलीस निरीक्षक पवार, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, गोरे, गायकवाड, सहायक फौजदार दिवेकर, पोलीस हवालदार सुनील शिंदे, पोलीस नाईक गायकवाड, नागलोत, पोलीस शिपाई कुदळे यांच्या पथकाने केली.

get_footer();