आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पुणे सायबरकडून दोन युट्युब चॅनेल मालकांवर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 20, 2021

वनविभागाची अतिक्रमणवर कारवाई : वनविभाग व शासनाची केली बदनामी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : वनविभागाने केलेल्या अतिक्रमण कारवाईनंतर दोन युट्युब चॅनेलने वनविभागाची आणि शासनाची बदनामी करुन दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन युट्यूब चॅनेलच्या मालकांवर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.16) घडला आहे.

पुणे सायबर पोलिसांनी आशुतोष झा थॉट्स आणि शिवशंकर स्वामी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मनोज संजय पारखे (वय-28 रा. मनपा शाळेजवळ, बाणेर) यांनी सायबर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.17) फिर्याद दिली आहे.

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वनविभागाने कायदेशीर अतिक्रमण काढण्याची कारवाई केली होती. आरोपींनी युट्युबच्या माध्यमातून दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करणारा व्हिडिओ संदेश व्हायरल केला. या व्हायरल संदेशाच्या माध्यमातून आरोपींनी वनविभागाची आणि महाराष्ट्र सरकारची बदनामी करुन खोटी माहिती प्रसारीत केल्याची तक्रार मनोज पारखे यांनी दिली आहे.

त्यानुसार दोन युट्युब चॅनेलच्या मालकांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संगिता माळी करीत आहेत.
वनविभागाचे अधिकारी मनोज पारखे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, वनविभागाने एका गोशाळेवर कारवाई केली होती. त्यावेळी आरोपींनी त्याचे चित्रिकरण करुन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा संदेशाचे व्हिडिओ प्रसारीत करुन वनविभागाची आणि शासनाची बदनामी केली.

get_footer();