आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पुणे स्टेशनवर मोबाईल चोरणारे दोन जण जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 4, 2022

बंडगार्डन पोलिसांत फिर्याद : उस्मानाबादला जाणाऱ्या रेल्वेची वाट पाहताना घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे रेल्वे स्टेशनवरील तिकीट काऊंटरसमोरील मोकळ्या जागेत धक्का मारून मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक केली. उस्मानाबादला जाणाऱ्या रेल्वेची वाट पाहत असताना २ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशनवर मोबाईल चोरी झाली.

आकाश नाथा जाधव (वय २२, रा. मामुडीगाव, देहूरोड, पुणे), पवन व्यंकट पाटील (वय २१, रा. माळी गल्ली, निलंगा, लातूर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी पंकज भंडारे (वय २२, रा. चोराखळी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी पुणे रेल्वे स्टेशनवरील तिकट काउंटर समोरील मोकळ्या जागेत उस्मानाबादला जाण्यासाठी थांबले होते. त्यावेळी आरोपींनी धक्का मारून हातातील दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेला. बंडगार्डन पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक डी. डी. बर्गे पुढील तपास करीत आहेत.

get_footer();