आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पुण्यात एसआरपीएफची परीक्षा भावाच्या नावावर देत होता

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 14, 2021

हडपसर पोलिसांकडून अटक : ब्ल्यु टुथद्वारे कॉपी करण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : रविवारी झालेल्या लेखी परिक्षेत एका तरुणाने आपल्या भावाच्या जागेवर पेपर देण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर त्याने ब्ल्यु टुथद्वारे कॉपी करण्याचा प्रयत्न केल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

विशाल गबरुसिंग बहुरे (रा. जोडवाडी, औरंगाबाद) असे अटक केलेल्याचे नाव आहे. भरतसिंग गबरुसिंग बहुरे (रा. जोडवाडी, औरंगाबाद) या त्याच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसआरपीएफ भरतीची रविवारी लेखी परिक्षा होती. हडपसर येथील एस. एम. जोशी कॉलेजमध्ये या परिक्षेचे केंद्र होते. यावेळी विशाल हा त्याचा भाऊ भरतसिंग याच्या नावाने लेखी परिक्षा देण्यास आला होता. परिक्षा देत असताना त्याने कॉपी करण्यासाठी ब्ल्यु टुथचा वापर करीत असल्याचे आढळून आले. त्याला जागेवरच पकडण्यात आले असून सहायक पोलीस निरीक्षक पडसळकर तपास करीत आहेत.

get_footer();