आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पुण्याच्या सुस खिंडीतील टेकडीवर युगलाला लुबाडले

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 20, 2021

चतुश्रुंगी पोलिसांत फिर्याद : मारहाण करीत दिली जीवे मारण्याची धमकी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सुस खिंडीतील टेकडीवर फिरायला गेलेल्या एका युगलाला तिघा चोरट्यांनी हाताने व लाकडाने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडील 1 लाख 7 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला.

याप्रकरणी चिंचवड येथे राहणार्‍या एका ३४ वर्षाच्या तरुणाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सुस खिंडीतील टेकडीवर शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजता घडली. फिर्यादी हे त्यांच्या मैत्रिणीसह सुस खिंडीतील टेकडीवर फिरायला गेले होते. यावेळी तिघे जण तेथे आले. त्यांनी या दोघांना थांबवून फिर्यादी यांना हाताने व लाकडाने मारहाण केली.

त्यांच्या मैत्रिणीच्या कानाखाली जोरात मारुन जीवे मारण्याची धमकी दिली. मैत्रिणीकडील २५ ग्रॅम वजनाचे ९० हजार रुपयांचे दागिने, २ मोबाईल, चांदींची आंगठी, २ हजार ३०० रुपये, पाकिट, त्यातील आधार कार्ड , पॅन कार्ड, ड्रायव्हीग लायसन असा १ लाख ७ हजार ३५० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. सहायक पोलीस निरीक्षक कोळी अधिक तपास करीत आहेत.

get_footer();