आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पुण्यातील पोलिस निरीक्षकालाच घातला गंडा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 1, 2022

बंडगार्डन पोलिसांत गुन्हा : फोन पे द्वारे घेतले पाच हजार रुपये

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : अंमली पदार्थ व अग्नीशस्त्रांची टिप देत असल्याचे भासवून एकाने चक्क पुण्यातील पोलीस निरीक्षकास गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

खलीलउल्ला आयनुल्ला खान असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक यांना १० डिसेंबर रोजी खान याने फोन करुन पोलीस सू्त्रधार असल्याचे सांगितले. दोघेजण मुंबईवरुन गाडीमध्ये पिस्टल व चरस हा अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती देत विश्वास संपादन केला. त्या मोबदल्यात त्यांच्याकडून फोन पेद्वारे ५ हजार रुपये घेतले. प्रत्यक्षात माहिती न देता पोलीस निरीक्षक व इतरांची फसवणूक केली. या खान याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी काही दिवस बंडगार्डन परिसरात नाकाबंदी केली. गुप्तपणे पाळत ठेवली होती. प्रत्यक्षात ही माहिती खोटी होती. त्यामुळे पोलिसांनी फसवणूक केल्याबद्दल खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक पवार अधिक तपास करीत आहेत.

get_footer();