आवृत्ती पुणे
← Back to Homepage

राजस्थानमधील अफीम बोंड्याचा चुरा बाळगणारे तिघे जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 15, 2021

मुंढवा पोलिसांनी केली कारवाई : २३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मुंढव्यात एक किलो ८४४ ग्रॅम अफीमच्या बोंड्याचा चुरा (दोडाचुरा) पॉपीस्ट्रॉ अमलीपदार्थ घेऊन आलेल्या राजस्थानमधील तिघांना मुंढवा पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून २३ हजार ८०० रुपयांचा अफीम बोंड्याचा चुरा (दोडाचुरा) जप्त केला. शनिवारी (दि. १३) पठारेवस्ती-खराडी आणि धायरकरवाडा-मुंढवा येथे पोलिसांनी कारवाई केली.

शिशपाल रत्नाराम राव (वय ३८, रा. पठारेवस्ती, खराडी, मूळ गाव- डाबरनगर लोहावट, ता. फोलोदी, जि. जोधपूर, राज्य राजस्थान), धर्माराज किसनाराम राव (वय २८, रा. धायरकरवस्ती, ताडीगुत्ता चौक, मुंढवा, मूळगाव- रावकाबैरी, ता. लोहावट, जि. जोधपूर, राजस्थान), साईराम भरमलराव सियाक (वय ३९, रा. मु.पो. एकालबोटा, ता. ओसिया, जि. जोधपूर, राजस्थान, सध्या रा. धायरकरवस्ती, ताडीगुत्ता चौक, मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध मुंढवा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, अंमली पदार्थविरोधी पथक गस्त घालीत असताना शनिवारी (दि. १३ नोव्हेंबर २०२१) सकाळी साडेदहाच्या सुमारास पठारेवस्ती, खराडी येथे एकाकडून एक किलो १७ ग्रॅम अफीमच्या बोंड्याचा चुरा (दोडाचुरा) पॉपीस्ट्रॉ असा एकूण १२ हजार रुपये किमतीचे अंमलीपदार्थ, तर दुपारी अडीचच्या सुमारास मुंढव्यातील धायरकर वाडा येथे दोघांकडून २३ हजार ८०० रुपयांचा अंमलीपदार्थ मिळून आले. तिघांविरुद्ध मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून अंमलीपदार्थ जप्त केला आहे.

पुणे पोलीस आयुक्तालयातील अंमलीपदार्थ विरोधी पथकातील पोलिसांनी मागील तीन वर्षामध्ये २४६ किलो गांजाप्रकरणातील ३१७ आरोपी, ब्राऊनशुगर तीन गुन्ह्यातील ४ आरोपी, चरस-अफू आठ गुन्ह्यातील १३ आरोपी, कोकेनच्या २४ गुन्ह्यातील ३५ आरोपी, एम.डी.च्या ३९ गुन्ह्यातील ५३ आरोपी, एलएसडीच्या ३ गुन्ह्यातील ६ आरोपींवर कारवाई केली आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर, पोलीस अंमलदार संतोष देशपांडे, संतोष जाचक, संदीप शेळके, साहिल शेख, महेश साळुंखे, आझीम शेख, युवराज कांबळे, योगेश मांढरे, दिनेश बास्टेवाड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();