आवृत्ती पुणे
← Back to Homepage

रिक्षामध्ये पॅसेंजर भरण्यावरुन रिक्षाचालकांमध्ये ठोकाठोकी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 8, 2022

मुंढवा पोलिसांत फिर्याद : मुंढवा-केशवनगर येथील संभाजी चौकात घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : रिक्षामध्ये पॅसेंजर भरण्यावरुन दोन रिक्षाचालकांमध्ये वाद झाल्याने रिक्षाचालकांनी एकमेकांना लाकडी दांडक्याने ठोकाठोकी केली. मुंढव्यातील केशवनगर येथील संभाजी चौकात रविवारी दुपारी बारा वाजता हा प्रकार घडला.

याप्रकरणी राहुल अंबादास जाधव (वय ३०, रा. मांजरी) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आकाश कैलास आडसुळे (वय २०, रा. कोळवडी, ता. हवेली) या रिक्षाचालकाला अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, राहुल जाधव व आकाश आडसुळे हे दोघे रिक्षाचालक आहेत. ते रविवारी दुपारी १२ वाजता केशवनगर येथील संभाजी चौकात प्रवाशांची वाट पहात होते. यावेळी त्यांच्यात प्रवासी घेण्यावरुन वाद झाला. तेव्हा आडसुळे याने शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. लाकडी दांडक्याने फिर्यादी यांच्या गुडघ्यावर, डोक्याच्या मागच्या बाजूला, हातावर, पायावर, मांडीवर व पाठीवर जोरात मारले. या मारहाणीत त्यांच्या उजव्या पायाचे नडगीचे हाड मोडून ते जबर जखमी झाले आहेत.

get_footer();