आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बलात्कार व घरफोडीतील फरारी आरोपीला ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 17, 2021

सोलापूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी : दहा हजार रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

: बलात्कार व घरफोडीच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीला सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. आरोपीकडून दहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

कोहिनूर दगडू काळे (वय २२, रा. ५८ फाटा, एमएसईबी बोर्डाजवळ, मसवड रोड, माळशिरस) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, माळशिरस पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अभिजित नाना गुजरे (रा. जगतापवस्ती, ता. माळशिरस) यांचे घर फोडून सोन्याचे दागिने, मोबाईल चोरून नेला होता. याप्रकरणाचा समांतर तपास सुरू असताना गुन्हेगाराची तांत्रिक आणि सूत्रांकडून माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला माळशिरस येथून ताब्यात घेतले. गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्याकडे तपास केला असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला अटक करून १०हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, पोलीस उपनिरीक्षक अमितसिद पाटील, सहाय्यक फौजदार शिवाजी घोळवे, सहाय्यक फौजदार सचिन मागाडे, केशव पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();