आवृत्ती पुणे
← Back to Homepage

लग्नाच्या आमिषाने नागपूरच्या महिलेवर बलात्कार

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 9, 2022

भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा : सव्वा तीन लाखांचे दागिनेही नेले चोरुन

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यातील एका तरुणाने नागपूरच्या महिलेशी ओळख वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखविले. तिला पुण्यात बोलावून लॉजमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिच्या पर्समधील ३ लाख २५ हजारांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात नागपूर येथे राहणाऱ्या एका ३६ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार समीर बेगमपूरे (रा. पुणे, पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि आरोपी यांची ओळख झाली. आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखविले. फिर्यादी या ५ जुलै २०२१ रोजी पुण्यात आल्या होत्या. समीर याने त्यांना कात्रज येथील हॉटेल राज येथे नेले. तेथे ते ६ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत होते. या दरम्यान समीर याने त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्याशी शारिरीक संबंध ठेवले. त्यानंतर नकळत त्यांच्या पर्समधील ३ लाख २५ हजार रुपयांचे १०८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. त्यानंतर फिर्यादी यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही. पोलीस उपनिरीक्षक ढमे अधिक तपास करीत आहेत.

get_footer();