आवृत्ती पुणे
← Back to Homepage

रेकॉर्डवरील तडीपार घातक हत्यारासह जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 15, 2021
1537
Spread the love

चतुश्रुंगी पोलिसांची कारवाई :५०० रुपयांचा किचा,एक स्टीलचा कोयता जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : जनवाडी मस्जिदच्या पाठीमागील मोकळ्या मैदानात थांबलेल्या दोन वर्षांपासून तडीपार गुन्हेगाराला घातक हत्यारासह जेरबंद केले. गुन्हे शाखा युनिट-४च्या पथकाने ही कारवाई केली.

प्रमोद ऊर्फ भुस्सा गोविंद यमकर (वय ३३, रा. पंपिंग स्टेशनजवळ, ओटा नं.१०१, गोखलेनगर, जनवाडी, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, तडीपार गुन्हेगार जनवाडी मस्जिदच्या पाठीमागिल मोकळ्या मैदानात आला असून, त्याच्याकडे घातक हत्यार आहे. तो गंभीर गुन्हा करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार घटनास्थळी सापळा रचून आरोपीला पकडून त्याच्याकडील ५०० रुपयांचा किचा, एक स्टीलचा कोयता जप्त केले. आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी चतुश्रुंगी पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, राजस शेख, दत्तात्रय फुलसुंदर, विशाल शिर्के, राकेश खुनवे, सागर वाघमारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

15 10 2021
get_footer();