आवृत्ती पुणे
← Back to Homepage

रिक्षा व मोटारसायकल चोरणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 10, 2021

गुन्हे शाखेच्या युनिट-१ची कारवाई : एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : रिक्षा व मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून एक लाख पाच हजार रुपये किमतीच्या एक रिक्षा आणि तीन दुचाक्या जप्त केल्या.

बुहान सादिक शेख (वय १९, रा. गफूर तकीया, सहारा कॅम्प, ३४४, घोरपडी पेठ, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

भवानी पेठेतील गुरुनानकनगर येथील संत रोहिदास उद्यानाजवळ रिक्षा व दुचाकी चोरणारा बुहान शेख थांबला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन तपास केला. त्यावेळी त्याने मोहसीन ऊर्फ मन्या अब्बास शेख (वय ३०, रा. चाँदतारा चौक, ३६५ गंज पेठ, पुणे) याच्या मदतीने घोरपडे पेठ येथून रिक्षा चोरी केल्याचे सांगितले. तसेच त्याने तीन दुचाक्या चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून एक लाख पाच हजार रुपये किमतीच्या रिक्षा, होंडा एक्टिव्हा, बजाज क्रिस्टल व होंडा डिओ अशा तीन दुचाक्या जप्त केल्या.

आरोपी मोसीन ऊर्फ मन्या अब्बास शेख हद्दपार असून, १४ नोव्हेंबर २०२१ पासून येरवडा जेलमध्ये आहे. त्याच्यावर चेन स्नॅचिंग, घरफोडी, वाहनचोरी अशा एकूण १५ गुन्हे विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट-१चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस अंमलदार अनिकेत बाबर, सतीश भालेकर, राहुल मखरे, दत्ता सोनावणे, महेश बामगुडे, इम्रान शेख, अजय थोरात, अशोक माने, शशिकांत दरेकर, अजय जाधव, अमोल पवार, तुषार माळवदकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();