आवृत्ती पुणे
← Back to Homepage

रिक्षातील प्रवाशाचा मोबाईल चोरणाऱ्यावर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 31, 2022

कोंढवा पोलिसांत फिर्याद : खडी मशीन चौकातील स्मशानभूमीसमोर झाली चोरी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : रिक्षातील प्रवाशाच्या हातातून दुचाकीवरील चोरट्याने मोबाईल चोरून नेला. खडी मशीन चौकातील स्मशानभूमीसमोरील रस्त्यावर १९ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.

ज्ञानेश्वर दारवटकर (वय ३१, रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे) यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी खडीमशीन चौक-कोंढवा-पुणे ते कात्रज रस्त्याने रिक्षामधून जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या हातातील पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला. कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पाटील पुढील तपास करीत आहेत.

get_footer();