आवृत्ती पुणे
← Back to Homepage

‘समेट’साठीच्या कालावधीत पत्नीवर पतीचा ‘बलात्कार’

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 16, 2021

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर न्यायालयानं दिला होता वेळ

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पती पत्नीला घटस्फोट घ्यायचा असेल, त्यांना काही कालावधीसाठी वेगळे राहण्यास कौटुंबिक न्यायालयाकडून सांगण्यात येते. या कालावधीत जर त्यांच्या समेट झाला नाही तर पुढे त्यांच्या घटस्फोटाला मान्यता दिली जाते. या फारकतीच्या काळात पत्नी वेगळी रहात असताना पती तिच्या घरी गेला व तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. पत्नीबरोबर संसार करण्यास तयार नाही, पण केवळ उपभोगासाठी पत्नी हवी असलेल्या या पतीविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी बलात्कारासह कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी कात्रज येथील एका २७ वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (६९७/२१) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी वडगाव बुद्रुक येथे राहणाऱ्या ३२ वर्षाच्या पती व त्याच्या आईविरुद्ध ४९८, ३७६ (ब), ३२३, ५०४, ४०६, ३४ अशा कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. शारीरीक व मानसिक छळ आणि शारीरीक जबरदस्तीचा हा प्रकार १४ नोव्हेबर २०१६ पासून आतापर्यंत सुरु होता.

पोलिसांनी सांगितले की, पती आणि सासु यांनी फिर्यादीस घर नावावर करुन त्यावर कर्ज काढण्यासाठी त्रास देण्यास सुरुवात केली. घरगुती कारणावरुन फिर्यादीचा शारीरीक व मानसिक छळ करुन पतीने फिर्यादीस वेगळे ठेवले. फिर्यादीविरुद्ध कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी दावा दाखल केला. हा दावा कोर्टामध्ये प्रलंबित असतानादेखील फिर्यादीच्या घरी येऊन फारकतीच्या कालावधीत फिर्यादीसोबत वेळोवेळी इच्छेविरुद्ध शरीरसंबंध केले, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

get_footer();