आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सराईत घरफोड्यास ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 9, 2021

वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी : तेहतीस लाखांच्या पाच घरफोड्या उघडकीस

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

घरफोड्या करणाऱ्या सराईतास बेड्या ठोकण्यात वारजे माळवाडी पोलिसांना यश मिळाले असून, एकूण तेहतीस लाखांच्या पाच घरफोड्या उघडकीस आल्या आहेत.

वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमधील एका गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस उपनिरीक्षक मुंढे आणि पोलीस नाईक राऊत यांनी यातील आरोपीचा कसोशीने शोध घेतला असता, गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून पद्माकर भगवानराव जोशी (वय ४६, रा. धायरी पुणे) यास ताब्यात घेण्यात आले. त्यांने व त्याच्या साथीदार अर्चना सुधीर खाडे (वय ४०, रा. मरकळ रोड आळंदी), निलीमा नितीन जोशी (वय ४४, रा. जुना बसस्टॅण्ड जवळ, आळंदी) यांनी एकत्रित आळंदी, वारजे व उत्तमनगर भागामध्ये घरफोडी केली असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले.

त्यांच्याकडून वारजे पोलीस स्टेशनकडील तीन, उत्तमनगर पोलीस स्टेशनकडील एक आणि आळंदी पोलीस स्टेशनकडील एक घरफोडी असा सोने, चांदी व रोख रक्कम एकूण ३३,४०,००० रुपयांच्या पाच घरफोड्या उघडकीस आणून उल्लेखनीय कामगीरी केलेली आहे.

सदरची कामगीरी ही, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपआयुक्त पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोणपे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके, पोलीस निरिक्षक अमृत मराठे, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे, मनोज बागल, पोलीस नाईक गोविंद फड, अमोल राऊत, काटकर, पोलीस शिपाई बाळू शिरसाठ, रमेश चव्हाण, अजय कामठे, नितीन कातुर्डे आणि विजय भुरूक यांनी केलेली आहे.

get_footer();