आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सराईत गुन्हेगार रोहन जगताप सहा महिन्यांकरीता तडीपार

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • June 15, 2022

बिबवेवाडी पोलीसांची कारवाई : गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल

महाराष्ट्र जैन वार्ता न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील बिबवेवाडी व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये शरीराविरुध्द व मालाविरुध्द गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला पुणे शहर परिमंडळ पाचचे पोलीस उपआयुक्त नम्रता पाटील यांंनी महा. पो कलम ५६ (१) (अ) (ब) कलमान्वेयनुसार ०६ महिन्यांकरीता करीता पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे परिक्षेत्र व पुणे जिल्हातुन तडीपारीचा आदेश पारीत केले आहे.

रोहन राजन जगताप (वय २१, रा. गल्ली नं. ०२, काकाडेवस्ती, कोंढवा बुद्रुक, पुणे) असे सहा महिन्याकरिता तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, बिबवेवाडी व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दित दहशत माजवत लोकांना दमदाटी करून लुटमार करणारा सराईत गुन्हेगार रोहन राजन जगताप यांची दिवसेंदिवस परीसरात दहशत वाढत असल्याने त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून देखिल त्याने पुन्हा शरीराविरुध्द व मालाविरुध्द या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केल्यामुळे बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे व पोलीस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व्हेलन्स पथकातील प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विक्रांत डिगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बारबोले, पोलीस अंमलदार दैवत शेडगे, डोळसे यांनी आरोपी विरोधात सबळ पुरावे गोळा करुन महा. पो. ॲक्ट कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे प्रस्ताव तयार करून पुणे शहर वानवडी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्फत पुणे शहर परिमंडळ पाचचे पोलीस उपआयुक्त नम्रता पाटील यांच्या कार्यालयात सादर केला असता पोलीस उपआयुक्तांनी सदर प्रस्तावाची पडताळणी करून सराईत गुन्हेगार रोहन राजन जगताप याला तडीपार केले आहे.

बिबवेवाडी पोलीसांनी कायदा-सुव्यवस्थेकामी तडीपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार रोहन राजन जगताप हा तडीपार कालावधीमध्ये तडीपारी आदेशाचा भंग करून पुणे शहरात किंवा बिबवेवाडी परिसरात दिसून आल्यास तात्काळ बिबवेवाडी पोलीस स्टेशन किंवा पुणे पोलीस नियंत्रण कक्ष येथे माहीती द्यावी असे आवाहन बिबवेवाडी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांंनी नागरिकांना केले आहे.

सदरची कारवाई ही, पुणे शहर परिमंडळ पाचचे पोलीस उपआयुक्त नम्रता पाटील, पुणे शहर वानवडी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे व पोलीस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर यांच्या सुचनेनूसार सर्व्हेलन्स पथकातील प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विक्रांत डिगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बारबोले, पोलीस अंमलदार दैवत शेडगे, डोळसे यांनी केली आहे.

get_footer();