आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सराईत गुन्हेगाराकडून एक लाखाचा मुद्देमाल जप्त

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 3, 2022

गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने केली कारवाई : एकूण नऊ गुन्हे उघड

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात मोबाईल आणि जबरी चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट-३ने अटक केली आहे. आरोपीकडून एक लाख १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन 9 गुन्हे उघडकीस आले आहेत.

विशाल संजय लोखंडे (वय-22 रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील गुन्हेगाराचा शोध गुन्हे शाखा युनिट-३चे पोलीस घेत होते. बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना बिबवेवाडी येथील सराईत गुन्हेगार विशाल लोखंडे हा बिबवेवाडी परिसरात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन 9 मोबाइल हँडसेट चोरीचे असून एकूण 9 गुन्हे उघडकीस आले. पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह 1 लाख 17 हजार 990 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत हडपसर पोलीस ठाण्यातील 6, कोंढवा, भारती विद्यापीठ, बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपी विरुद्ध पुणे शहरात चोरी, जबरी चोरी, घरफोडी, मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार महेश निंबाळकर, संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, रामदास गोणते, विल्सन डिसोझा, संजीव कळंबे, सोनम नेवसे, राकेश टेकावडे, दिपक क्षिरसागर, प्रकाश कट्टे, ज्ञानेश्वर चित्ते, भाग्यश्री वाघमारे, सुजित पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();