आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल जप्त

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 18, 2021

पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट तीनची कारवाई : पिस्टलसह जिवंत काडसुतं जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज

पुणे : पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार सराईत गुन्हेगार प्रतिबंधात्मक कारवाईच्या उद्देशाने गुन्हे शाखेच्या युनीट तीनच्या पथकाने सराईत गुन्हेगार मयुर अरविंद चव्हाण (वय २३ वर्षे रा. लमाणवाडी, बालाजी हाईटस, खडकवासला) याच्या तपासात त्याच्या जवळ असलेले गावठी पिस्टल व जिवंत काडतूसे जप्त केले.

पुणे शहर पोलिस आयुक्त, पोलीस सह आयुक्त व अपर पोलीस आयुक्त, यांनी पुणे शहरातील गुन्हेगारी नष्ट व्हावी व गुन्हयांना प्रतिबंध व्हावा याकरीता पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार यांना चेक करुन त्यांचे विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहे. या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पथक सोमवारी अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलींग करत असताना पोलीस हवालदार राजेंद्र मारणे यांना मिळालेल्या माहितीवरुन रेकॉर्डवरील गुन्हेगार मयुर अरविंद चव्हाण (वय २३ वर्षे रा. लमाणवाडी, बालाजी हाईटस रुम नं १, खडकवासला, पुणे) याय गोसावी वस्ती येथील वर्षा कारकेअर सेंटर, समोरून ताब्यात घेतले असता त्याच्याकडून एक गावठी बनावटीचा पिस्टल व एक जिवंत काडतुस असा एकूण ४०,४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्याच्या विरुद्ध अलंकार पोलीस स्टेशन पुणे येथे आर्म अॅक्ट कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१)(३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हयाचा तपास सहा पोलीस निरीक्षक अमृता चवरे हे करीत आहेत नमूद आरोपीत हा सिहंगड रोड पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द हवेली पोलीस स्टेशन येथे खुनाचा प्रयत्न व दंगा केल्यांचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह-आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, सहा पोलीस निरीक्षक अमृता चवरे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे व पोलीस अंमलदार राजेंद्र मारणे, महेश निंबाळकर, विल्सन डिसोजा, दिपक क्षिरसागर व सुजित पवार यांनी केली आहे.

get_footer();