आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सराईत मोबाईल चोरट्याला जेरबंद करीत २२ हँडसेट केले जप्त

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 21, 2021

विश्रामबाग पोलिसांची कामगिरी : गर्दीचा आणि उघड्या दरवाजावाटे घरात जाऊन करतो चोरी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सराईत मोबाईल चोरट्याला जेरबंद करीत त्याच्याकडून २२ विविध कंपन्यांचे मोबाईल हँडसेट जप्त केले. त्याच्यावर विश्रामबाग, वारजे-माळवाडी आणि हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असल्याचे तपासात उघडकीस आले, असे विश्रामबागवाडा पोलिसांनी सांगितले.

मुरली नागराज (वय ३५, रा. मरिअम्मा मंदिराजवळ, नागोरी, जि. शिमोगा, कर्नाटक) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, भरत कानसिंग राजपुरोहित (वय ३०, रा. रामेश्वर मंदिराजवळ, शुक्रवार पेठ, मूळ रा. पुनडिया, ता. राणी, जि. पाली, राजस्थान) यांनी मोबाईल चोरी झाल्याची तक्रार विश्रामबाग पोलीस स्टेशनला दिली होती. त्याअनुषंगाने पोलीस आरोपीचा तपास करीत होते.
सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोध घेत असताना गुन्ह्यातील चोरटा कात्रज परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलिसांना पाहताच त्याने पळ काढत असताना पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या घरी विवो, ओपो, रेडमी, रिअलमी आदी कंपन्यांचे २२ मोबाईल हँडसेट आढळून आले असून, ते जप्त केले. त्याच्यावर विश्रामबाग, वारजे माळवाडी आणि हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून, तो सराईत गुन्हेगार असून, गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करणे, उघड्या दरवाज्यावाटे घरामध्ये प्रवेश करून मोबाईल चोरी करण्याची त्याची पद्धती असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाले, पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग देसाई, पोलीस निरीक्षक सुनील माने, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक कुंडलिक कायगुडे, पोलीस अंमलदार राकेश सरडे, संजय दगडे, शरद वाकसे, हेमंत पालांडे, प्रशांत शिंदे, प्रशांत पालांडे, सताप्पा पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();