सराईत वाहनचोराच्या मुसक्या आवळून चार दुचाक्या केल्या जप्त
फरासखाना पोलिसांची कामगिरी : गणेश पेठेतील दुधभट्टी येथे सापळा रचून आरोपीला घेतले ताब्यात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : सराईत वाहनचोराच्या मुसक्या आवळून चार दुचाक्या जप्त केल्या. फरासखाना पोलिसांनी गणेश पेठेतील दुधभट्टी येथे कारवाई केली. आरोपी सराईत वाहनचोर असून, त्याच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
गणेश मल्लेश रायचूर (वय २५, रा. एच.पी. लोहियानगर, फायरब्रिगेडसमोर, कांबळे गल्ली, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, वाहनचोरांचा शोध सुरू असताना गणेश पेठेतील दुध भट्टी येथे चोरीची दुचाकी घेऊन एकजण थांबला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सापळा रचून त्याला दुचाकीसह ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने आणखी चार गाड्या चोरी केल्याची कबुली दिली. त्या चारही गाड्या जप्त केल्या असून, त्याबाबत फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी रेकॉर्डवरील सराईत वाहनचोर असून, त्याच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, तेजस्वी पाटील करीत आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील, पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, पोलीस अंमलदार संदीप कांबळे, समीर माळवदकर, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, रिजवान जिनेडी, मेहबूब मोकाशी, सयाजी चव्हाण, वैभव स्वामी, राकेश क्षीरसागर, ऋषिकेश दिघे, अभिजित शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
