आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सराईत वाहनचोराला ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 11, 2022

दरोडा व वाहनचोर पथक-२ची कारवाई : आरोपी हडपसर पोलीस स्टेशनच्या ताब्यात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सराईत चोरट्याला साडेसतरानळी येथे कारवाई करून गुन्हे शाखा दरोडा व वाहनचोरी पथक-२ने जेरबंद केले. आरोपीकडून १५ हजार रुपये किमतीची हिरोहोंडा जप्त केली. आरोपीला पुढील कारवाईसाठी हडपसर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

प्रतिक प्रकाश जगताप (वय २४, रा. ठाणगेनगर, साडेसतरानळी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

दरोडा व वाहन चोरीपथक-२ हडपसर पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखा युनिट-५ हद्दीमध्ये गस्तीवर असताना साडेसतरानळी येथे नंबर प्लेट खोडलेली दुचाकी घेऊन एक व्यक्ती उभी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार तातडीने घटनास्थळी धाव घेत सापळा रचून संशयावरून ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केला असता, त्याने नोबेल हॉस्पिटलसमोरून हिरो स्प्लेंडर एमएच-१२-एचएम-८३३३ चोरल्याची कबुली दिली. त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याने वैद्यकीय व कोविड-१९ तपासणी करून पुढील तपासासाठी हडपसर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त नारायण शिरगांवकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, सहायक पोलीस फौजदार उदय काळभोर, पोलीस अंमलदार राजेश लोखंडे, दिनकर लोखंडे, विनायक रामाने, मनोज खरपुडे, गणेश लोखंडे, अमोल सरतापे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();