आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सराईताकडून गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस- युनिट-३ची कारवाई

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 21, 2021

महाराष्ट्र ३६० न्यूज

शहरातील गुन्हेगारी नष्ट व्हावी आणि गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा याकरिता वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस शिपाई दीपक क्षीरसागर यांना सराईत गुन्हेगाराची माहिती मिळाली. त्यानुसार घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त केले. त्याच्यावर आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

रोहन बाळासाहेब गबदुले (वय २७, रा. किरकिटवाडी, ता. हवेली, जि. पुणे)

पोलिसांनी सांगितले की, वारजे-माळवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस गस्त घालत होते, त्यावेळी सराईत गुन्हेगाराची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वेदांती फॅमिली गार्डन रेस्टॉरंट व बार जवळील रस्त्यावरून ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस असा ४० हजार ४००रुपयांचा माल हस्तगत केला असून, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीवर हवेली पोलीस स्टेशनमध्ये हद्दीतील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर दंगा केल्याचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, युनिट-३चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, सहायक पोलीस निरीक्षक अमृता चवरे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार सहायक पोलीस फौजदार निंबाळकर, संतोष क्षीरसागर, पोलीस नाईक कल्पेश बनसोडे, पोलीस शिपाई प्रकाश कट्टे, सुजित पवार, भाग्यश्री वाघमारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();