आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सरपंच सेवा संघाच्या पुणे जिल्हा संपर्कप्रमुख पदी सुरेश वांढेकर यांची नियुक्ती

maharashtra jain warta • News Slider, Previous Issue, Social • January 21, 2022

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्रातील सर्व सरपंचांच्या मनामनात रुजलेली सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्यात या संघटनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व सरपंचांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेली राज्यातील नोंदणीकृत संघटना महाराष्ट्रभर कार्यरत आहे. या संघटनेच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रात सरपंच संघटन मजबूत करण्यासाठी संघाचे संस्थापक सरपंच संघटीत चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर कार्यरत आहे.

सरपंच यांना येणाऱ्या अडचणी व विविध शासकीय योजना सर्व सामान्य माणसाला ग्रामपंचायतच्या माध्यमातून सेवा देण्यासाठी सरपंच अहोरात्र मेहनत घेत आहेत. या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत आदर्श गावे निर्माण करण्यासाठी सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील अहेरी, आर्वी सह काही गावांमध्ये प्रत्यक्षात कामे सुरू झाली आहेत.

सरपंच सेवा संघाच्या वतीने राज्यभर संघटनात्मक संरचना सुरू आहे. पुणे विभागीय अध्यक्ष सुरेश राठोड यांच्या नेतृत्वाखाली सरपंच सेवा संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष सरपंच सुखदेव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सेवा संघाच्या पुणे जिल्हा संपर्कप्रमुख पदी सुरेश सटवाजी वांढेकर पाटील रा.वाघोली (ता: हवेली) जि.पुणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती संस्थापक बाबासाहेब पावसे तसेच महाराष्ट्र प्रदेश सोशलमिडीया प्रमुख रोहीत पवार, राज्य संघटक रविंद्र पवार,महीला अध्यक्ष सरपंच प्रमिला एखंडे, सरपंच मा.रविराज गाटे, सागर कासार, महेश शिंदे, दिपक मनसुख, निलेशकुमार पावसे, सागर कोल्हे, सिध्देश आहेर, सरपंच जयकुमार माने, यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. यांच्या निवडीबद्दल जिल्ह्यातील सर्व सरपंचांसह सर्वस्तरावरुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

get_footer();