आवृत्ती पुणे
← Back to Homepage

ससून रुग्णालयात महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणारा अटकेत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 9, 2021

बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : वारंवार होणाऱ्या त्रासाला वैतागून दिली फिर्याद

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचा रुग्णालयातील कर्मचाऱ्याने विनयभंग केला. याप्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा प्रकार 2019 ते 5 नोव्हेंबर 2021 या कालावधित घडला आहे.

रोहित रत्नाकर बागल (वय-33 रा. ससुन क्वार्टस पुणे) याला अटक केली आहे. याप्रकरणी 29 वर्षाच्या महिला कर्मचाऱ्याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिला हे एकमेकांच्या ओळखीचे असून, ससून हॉस्पिटलमध्ये कामाला आहेत.
महिला कामावर एकटी असताना आरोपीने पीडित महिलेला ‘तू मला खूप आवडतेस’ असं म्हणून लज्जास्पद कृत्य केले. आरोपी एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने पीडित महिलेला दमदाटी केली. आरोपीकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला वैतागून महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यासंदर्भात तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक साबळे यांच्याशी संपर्क साधला असता, आरोपी आणि पीडित महिला रुग्णालयात नेमके कोणते काम करतात याची माहिती मिळू शकली नसल्याचे सांगितले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

get_footer();