आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सट्ट्यात हरलेल्या 4 लाखांच्या वसुलीसाठी अपहरण

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 17, 2021

कोंढवा पोलिसांत पाचजणांवर गुन्हा : जबरदस्तीने ऐवज काढून घेत जीवे मारण्याची दिली धमकी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मोबाईलवर खेळलेल्या सट्ट्यातील तब्बल ४ लाख रुपयांची वसुली करण्यासाठी पाच जणांनी तरुणाचे अपहरण करुन त्याच्या खिशातील सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल व गुगल पे वरुन १५ हजार रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करुन घेऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी पाच जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

राजेंद्र संगय्या हिरेमठ (वय ३५, रा. बिबवेवाडी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अभय जोगदंड (वय ३०, रा. अपर डेपो, बिबवेवाडी), अभी बाळशंकर (वय ३२, रा. काकडेवस्ती, कोंढवा) आणि त्यांच्या ३ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार १० सप्टेंबर, १८ व १९ ऑक्टोबर रोजी बिबवेवाडी व कोंढव्यात घडला.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी हे त्यांच्या मोबाईल वर खेळलेल्या सट्ट्यामध्ये ३ लाख ९६ हजार रुपये हरले होते. हे पैसे परत देत नाही, म्हणून आरोपींनी प्रथम १० सप्टेबर रोजी त्यांना आमचे पैसे आताच्या आता दे नाही तर तुला उचलून नेतो व तुझे हात पाय तोडतो, अशी धमकी दिली होती.

त्यानंतर १८ ऑक्टोबर रोजी अक्कलकोट येथे फिर्यादी यांच्या पत्नी कडून फिर्यादीचा मोबाईल व पर्वतीतील जनता वसाहत येथे लावलेल्या भिशीच्या संबंधाने करायच्या केसची कागदपत्रे घेतली. फिर्यादी यांना चारचाकी गाडीत घालून त्यांचे अपहरण केले. गाडीत पाईप़ कमरेचा पट्टा, वायर व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या खिशामधील अर्धा अर्धा तोळे वजनाच्या ८ सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल फोन व गुगल पे वरुन १५ हजार रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करायला लावले असा १ लाख रुपयांचा ऐवज जबरदस्तीने घेऊन गेले. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

get_footer();