आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सय्यदनगर-हांडेवाडी येथे घातक शस्त्र बाळगणार्‍यास दरोडा पथकाने केले जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 23, 2021

दरोडा व वाहन चोरीविरोधी पथक-2 : ज्योतिबा शिंदेला केली अटक

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

सय्यदनगर रेल्वे गेटच्या पुढे हांडेवाडी रोड येथे घातक शस्त्र घेऊन फिरत असलेल्या इसमास दरोडा व वाहनचोरीविरोधी पथकाने जेरबंद केले. शनिवारी (दि.21 ऑगस्ट) रोजी ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी वानवडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.

ज्योतिबा विठ्ठल शिंदे (वय 24, रा. कामठेवस्ती, माळवाडी-हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरीविरोधी पथक-2चे अधिकारी व अंमलदार पूर्व विभागाच्या हद्दीत रेकॉर्डवरील वाहनचोर व तडीपार, फरारी, पाहिजे असलेल्या आरोपींचा तपास करीत होते. त्यावेळी राज मटन शॉप,सय्यदनगर रेल्वे गेटच्या हांडेवाडी रोडवर 20 ते 25 वयाची व्यक्ती घातक हत्यार घेऊन फिरत असल्याची माहिती सहायक पोलीस फौजदार यांना सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे लोखंडी कोयता मिळून आला. त्याच्याविरुद्ध फिर्याद देऊन पुढील कारवाईसाठी वानवडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप, सहायक पोलीस फौजदार उदय काळभोर, पोलीस हवालदार राजेश अभंगे, शाकिर खान, पोलीस शिपाई अमोल सरतापे, संभाजी गंगावाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();