आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सेल्फी दाखवून 15 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 18, 2021

हडपसर परिसरातील घटना : जून ते ६ डिसेंबर २०२१ दरम्यान घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सेल्फी घेऊन तो आईवडिलांना दाखवून बदनामी करतो, अशी धमकी देऊन एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार जून 2021 ते 6 डिसेंबर 2021 दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी घडला.

हडपसर पोलिसांनी जनार्दन केशव गोवंदे (रा. मगरपट्टा, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पिडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि फिर्यादी हे एकाच ठिकाणी राहतात. आरोपीने फिर्यादी यांच्या 15 वर्षाच्या मुलीबरोबर सेल्फी फोटो घेतला होता. तो सेल्फी फोटो आई वडिलांना दाखवितो व तुझी बदनामी करतो, अशी धमकी त्याने या मुलीला दिली. तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारिरीक संबंध केले. याची माहिती मिळाल्यानंतर तिच्या आईने फिर्याद दिली. हडपसर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

get_footer();