आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दुकान फोडून ११ लाख रुपयांच्या मोबाईलवर चोरट्यांचा डल्ला

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 3, 2022

हडपसर पोलिसांत फिर्याद : ससाणेनगरमधील पाटील प्राईममध्ये झाली चोरी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : दुकान फोडून १० लाख ५८ हजार २२० रुपयांचे १५ विविध कंपन्यांचे मोबाईल हँडसेटवर चोरट्यांनी डल्ला मारला. हडपसरमध्ये (ससाणेनगर, पाटील प्राईमस) ३१ जानेवारी रोजी रात्री १०.३० ते १ फेब्रुवारी २०२२ रोजी पहाटे अडीचच्या दरम्यान चोरीची घटना घडली.

निखील वाडकर (वय २७, रा. वाडकरमळा, महंमदवाडी रोड, पद्मावती मंदिराशेजारी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचे चॉईस कम्युनिकेशन नावाचे दुकान कुलूप बंद केले होते. चोरट्यांनी कडीकोयंडा उचकटून दुकानातील विविध कंपन्यांचे १५ मोबाईल हँडसेट १० लाख ५८ हजार २२० रुपयांची चोरी केली. हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमंत गायकवाड पुढील तपास करीत आहेत.

get_footer();