आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दुकानांमधील किमती सिगरेटची पाकीटे चोरणारा गजाआड

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 27, 2021

गुन्हे शाखेच्या युनिट-४ची कामगिरी : एक लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : बंद दुकानांचे कुलुप तोडून दुकानमधील किमती सिगरेट पाकीटे चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-४च्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीने शनिवारी (दि.23) रात्री चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुर्वेश बेकरीमध्ये चोरी केली होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि किमती सिगरेट पाकिटे असा एकूण 1 लाख 17 हजार 120 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सुरज बळीराम कदम (वय-29 रा. ताडीवाला रोड, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखा युनिट-४चे पथकातील पोलीस अंमलदार राकेश खुणवे व अशोक शेलार यांनी सीसीटीव्ही फुटेज द्वारे आरोपींचा तपास घेतला. दरम्यान, वेगवेगळ्या कंपनीची चोरलेली सिगारेटची पाकिटे निम्म्या किमतीत विकण्यासाठी आरोपी संगमवाडी पार्किंग 2 परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संगमवाडी पार्किंग 2 च्या परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गोखलेनगर रोडवरील दुर्वेश बेकरी या दुकानात चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करुन पुढील कारवाईसाठी आरोपीला चतु:श्रृंगी पोलिसांच्या ताब्यात दिले.

सदर कामगिरी ही पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर, उपनिरीक्षक जयदीप पाटील, पोलीस अंमलदार महेंद्र पवार, दत्तात्रय फुलसुंदर, विशाल शिर्के, राकेश खुणवे, अशोक शेलार यांच्या पथकाने केली.

get_footer();