आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अल्पयवीन मुलाचा मोबाईल चोरणारे दोघे जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 28, 2022

कोंढवा पोलिसांत फिर्याद : खडी मशीन चौकात अल्पवयीन मुलाचा चोरला मोबाईल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पादचाऱ्याचा मोबाईल चोरून नेणाऱ्या दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली. कोंढव्यातील खडीमशीन चौकात २५ जानेवारी २०२२ रोजी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली होती.

शहाबाज इलियास खान (वय १९), रमिज रियाज सैय्यद (वय १९, दोघे रा. अश्रफनगर, कोंढवा, पुणे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

याप्रकरणी खडी मशीन चौक येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने कोंढवा पोलसांत फिर्याद दिली असून, त्यानुसार दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी कोंढव्यातील खडी मशीन चौकातून जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसका मारून चोरून नेला. कोंढवा पोलीस स्टेशनचे समाधान मचाले पुढील तपास करीत आहेत.

get_footer();