आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गायक मोहम्मद अयाज सोलापूर जिल्ह्याचे ब्रँड अँम्बॅसिडर

maharashtra jain warta • News Slider, Previous Issue, Social • May 25, 2023

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

सोलापूर : महाराष्ट्राचा महागायक स्पर्धेचे विजेते प्रसिद्ध गायक मोहंम्मद अयाज यांची सोलापुरच्या ब्रँड अँम्बॅसिडर म्हणून निवड झाली आहे. सोलापुर जिल्हा परिषदेचे प्रशासकीय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
मोहम्मद अयाज यांनी आजपर्यंत केलेल्या कामाची दखल घेऊन आणि कलेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याचे नाव देशपरदेशात गाजवले आहे. कला, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सोलापूर जिल्हा व्यसनमुक्ती आणि राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकीसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून अयाज समाज प्रबोधन करणार आहेत.
संगीत जगतचे गुरुवर्य पंडीत हदयनाथ मंगेशकर यांनी साम गुरुकुल या रियालिटी सिंगीग शो मध्ये जेव्हा मोहम्मद अयाज महाराष्ट्राचा महागायक विजेता् ठरला तेव्हा सोलापूर सुरमणी ही उपाधी देऊन गौरविण्यात आले.
यावेळी झालेल्या समारंभात मोहम्मद अयाज यांनी ‘एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तो ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तो’ हे गीत सादर करुन आपली भावना व्यक्त केली. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य समन्वयक अनुष्का शर्मा, ओरिसाचे राज्य समन्वयक अभिनव घोलप, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनिल खामितकर सह अनेक कर्मचारी उपस्थित होते.

ब्रँड अँम्बॅसिडर होणे अभिमानस्पद
जिल्हा प्रशासनाने माझ्यासारख्या कलावंताला ब्रँड अँम्बॅसिडरची उपाधी देऊन माझा सन्मान वाढवला आहे अशी प्रतिक्रिया अयाज यांनी दिली आहे. माझ्यासह सर्व सोलापूर रसिकांसाठी ही गोष्ट अभिमानास्पद असल्याचे सांगून प्रशासन जे काही माझ्या वर जबाबदारी देईल ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडणार अशी प्रतिक्रिया मोहम्मद अयाज यांनी दिली.
अयाज यांनी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, सुनिल खामीतकर व सर्व प्रशासनाचे आभार ही मानले.

get_footer();