आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बनावट फेसबुक अकाऊंटद्वारे बदनामी करणाऱ्यावर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 13, 2022

कोंढवा पोलिसांत गुन्हा : बलात्काराच्या गुन्ह्यानंतरही महिलेला देतोय त्रास

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवून बलात्कार केल्याच्या प्रकरणात अटकेनंतर जामिनावर सुटून आलेला आरोपी संबंधित महिलेला तिच्या घरी जाऊन त्रास देत असून बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन त्यावर या महिलेची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी एका ३१ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी समीर बाळू निकम (रा. जिजाऊ बिल्डींग, नर्‍हेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, या महिलेने समीर निकम याच्याविरुद्ध मारहाण करुन बलात्कार केल्याची फिर्याद दिली होती. त्या गुन्ह्यात समीर याला अटक झाली होती. त्यातून तो जामिनावर सुटून बाहेर आल्यानंतर डिसेंबर २०२१ पासून तो पुन्हा या महिलेला त्रास देऊ लागला. फिर्यादी रहात असलेल्या ठिकाणी येऊन तुझा मुलगा माझा आहे. तो मला दे, नाही तर मी कोणत्याही थराला जाऊ शकतो, अशी धमकी दिली. त्याकडे या महिलेने दुर्लक्ष केल्यावर त्याने या महिलेच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले. कोंढवा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीशी संबंधित असलेला बदनामीकारक मजकूर फेक फेसबुक अकाऊंटवर टाकला. तसेच त्या अकाऊंटवरुन या महिलेच्या नातेवाईक व इतरांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यावर अश्लिल शेरेबाजी करुन या महिलेची बदनामी केली. या महिलेच्या मित्रमैत्रिणीला फोन करुन तिची बदनामी केली.
पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

get_footer();