आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सोन्याचे गंठण चोरणाऱ्या पुरुषासह दोन महिलांवर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 20, 2021

लष्कर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : गंठण खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करून केली चोरी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सोन्याच्या दुकानातून हातचलाखीने ५० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण चोरी करणाऱ्या एका पुरुषासह दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सेंट्र स्ट्रीट, कॅम्पमधील ज्वेलर्सच्या दुकानात ही घटना १७ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली.

निखिल पालरेचा (वय २९, रा. ईस्ट स्ट्रीट, कॅम्प, पुणे) यांनी लष्कर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अनोळखी पुरुष व दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, एक पुरुष व दोन महिला सेंटर स्ट्रीट येथील सोन्याच्या दुकानात आले. गंठण खरेदी करण्याचा बहाणा करीत हातचलाखीने ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरून नेले. लष्कर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शिळीमकर पुढील तपास करीत आहेत.

get_footer();