आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सोन्याच्या पाच अंगठ्यांवर डल्ला मारणारी महिला अटकेत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 31, 2022

खडक पोलिसांत फिर्याद : गणेश पेठेतील ज्वेलर्समध्ये झाली चोरी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : ज्वेलर्सच्या दुकानामधून एक लाख ७० हजार रुपयांच्या सोन्याच्या पाच अंगठ्यांवर महिलेने डल्ला मारला. या प्रकरणी दुकानात काम करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. गणेश पेठ (कस्तुरी चौक) येथील ज्वेलर्सच्या दुकानामध्ये २५ जानेवारी २०२२ रोजी रात्री सव्वासातच्या सुमारास ही चोरीची घटना घडली.

आरोपी महिलेला अटक केली आहे. याप्रकरणी भूमिक राजेश सोनी (वय २९, रा. ६०३, गणेश पेठ, कस्तुरी चौक, पुणे) यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचे कस्तुरी चौकातील गणेश पेठ येथे ज्वेलर्सचे दुकान आहे. दुकानामध्ये काम करनाऱ्या महिलेने शो-रूममधील एक लाख ७० हजार रुपये किमतीच्या पाच सोन्याच्या अंगठ्या चोरून. खडक पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे पुढील तपास करीत आहेत.

get_footer();