आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अभंग व भजन स्पर्धेतल्या सहभागी बंद्यांना मिळणार विशेष माफी

maharashtra jain warta • News Slider, Other, Police, Previous Issue, Social • June 29, 2023

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : येथील शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान, पोलिस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या संयुक्त विद्यमाने कारागृहातल्या बंदीजनांसाठी राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व बंद्यांना माफी देण्याची घोषणा कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी केली आहे.

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांच्या विशेष प्रयत्नांतून बंदीजनांमध्ये बदल घडवण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण महाराष्ट्रातल्या कारागृहांमधल्या बंदीजनांनी यामध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेची अंतिम फेरी १३ जून ला पार पडली. स्पर्धेतल्या महाअंतिम फेरी करीता निवड झालेल्या कारागृह संघांतील बंद्यांना 90 दिवस माफी मिळणार आहे. तर उल्लेखनीय प्रदर्शन करून उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेल्या कारागृह संघातील बंद्यांना 60 दिवस व इतर सहभागी संघातील बंद्यांना 30 दिवस माफी देण्यात येणार आहे. ही घोषणा कारागृह महानिरीक्षकांनी केली आहे. या माफी योजनेमुळे बंदीजनांमध्ये सकारात्मक मानसिकता निर्माण होऊन, त्यांची कारागृहातून लवकर सुटका होईल, तसेत समाजात पुनर्वसन होण्यास मदत मिळेल. लक्ष्मीकांत खाबिया यांच्या उद्देशाला यामुळे बळ मिळणार आहे.

get_footer();