आवृत्ती पुणे
← Back to Homepage

युवा विचार परिवर्तन उपक्रमांतर्गत पुना कॉलेजमध्ये विद्यार्थी समुपदेशन

maharashtra jain warta • News Slider, Other, Previous Issue, Social • June 30, 2023

शहर पोलिसांच्या सोशल आऊटरिच संकल्पनेतून राबवला उपक्रम

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : शहर पोलिसांच्या सोशल आउटरिच या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या युवा विचार परिवर्तन उपक्रमाची सुरूवात पुना कॉलेजमधून झाली. त्यामध्ये गुन्हे शाखेतर्फे विद्यार्थ्यांचे समुपमेदशन करण्यात आले. सोशल आउटरिच ही पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार, तसेच पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची संकल्पना आहे.

यावेळी विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागलेल्या अंमली पदार्थांच्या सेवनाच्या सवयी व त्याचे वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक दुष्परिणाम यांच्याविषयी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश निर्मल यांनी मार्गदर्शन केले. मुलींवरील हल्ल्यांच्या पार्श्वभुमीवर मुलींनी दैनंदिन प्रवास, सहली तसेच रात्री उशिरा प्रवास करताना घ्यायची काळजी आणि स्वसुरक्षेबाबत काय पावले उचलावीत याविषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
यामध्ये सोशल मीडियाचा गैरवापर व त्याचे दुष्परिणाम याविषयीही विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सामाजिक सलोखा व एकोपा राखावा याविषयीही त्यांना मार्गदर्शन कऱण्यात आले. उपक्रमाच्या 27 जून रोजी झालेल्या उद्घाटनासाठी पुना कॉलेज चे प्राचार्य डॉ. अन्वर शेख, डॉ. गुलाब पठाण, गुन्हे शाखा युनिट 6 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तर 80 हून अधिक कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. आर. के. बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्यातून युवा विचार परिवर्तन उपक्रम राबवण्यात येत असून पुणे शहर गुन्हे शाखेच्या वतीने पुण्यातल्या इतर महाविद्यालयांमध्येही तो राबवण्यात येईल. पुना कॉलेजमधील या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अन्वर शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन गुलाब पटेल यांनी केले. आर. के. बहुद्देशीय संस्थेच्या सचिव भाग्यश्री साळुंके यावेळी उपस्थित होत्या.

get_footer();