आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सुखसागरनगर येथे ओढामार्गाच्या कामाठिकाणी दुचाकी खड्ड्यात आदळून एकाचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 19, 2021

सुरक्षा उपाययोजनेच्या अभावाने दुर्घटना : ठेकेदार कंपनीसह तीन अभियंत्यांवर गुन्हा दाखल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सुखसागरनगरमध्ये ओढामार्गाच्या कामाठिकाणी दुचाकी खड्ड्यात आदळून झालेल्या अपघातात एक जण ठार, तर एक गंभीर जखमी झाला आहे. सुरक्षा उपाययोजनेचा अभावाने ही दुर्घटना घडली असून, ठेकेदार कंपनीसह तीन अभियंत्यांवर भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कात्रज परिसरात ओढ्याचे काम सुरू असताना त्या ठिकाणी रस्ता दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी खुला ठेवत तेथे उपाययोजना न केल्याने खड्ड्यामुळे दुचाकीचा अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.


याप्रकरणी महादेव सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये पाटील कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी व कंपनीचे अभियंता सचिन कुरणे, शैलेश जाधव व लापसिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडू पुजारी (वय 24, रा. सुखसागर) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे, तर महादेव सूर्यवंशी (वय 25) हे जखमी झाले आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज भागातील सुखसागरनगर गट नंबर 31 अंतर्गत पालिकेकडून ठेकेदाराला रोड ओढ्याचे काम देण्यात आले आहे. पाटील कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून हे काम केले जात आहे. यादरम्यान हे काम करत असताना सुरक्षेची कोणतीही उपाययोजना न करता दोन्ही बाजूने रोड वाहतूकीसाठी खुला ठेवला. तसेच, त्यांच्या निष्काळजीपणामुळे खंडु पुजारी या दुचाकीस्वाराचा या खड्ड्यामुळे अपघात होऊन दोघेही जखमी झाले होते. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण, उपचार सुरू असताना खंडू पुजारी यांचा मृत्यू झाला आहे.


या प्रकरणी महादेव सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये पाटील कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी व कंपनीचे अभियंता सचिन कुरणे, शैलेश जाधव व लापसिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यांचा अधिकचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक थोरात हे करत आहेत.

get_footer();