आवृत्ती पुणे
← Back to Homepage

स्वस्तात फ्लॅट देण्याच्या बहाण्याने 34 लाखांचा गंडा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 31, 2021

ब्रह्मा इस्टेट येथे घडला प्रकार : कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये दोघांवर गुन्हा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

स्वस्तात फ्लॅट देण्याच्या बहाण्याने दोघांनी एका 55 वर्षीय व्यक्तीची 34 लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2017 ते 2019 या कालावधीत पुण्यातील कोंढवा खु. येथील फोनीक्स ग्रॅुप इंडीया ब्रह्मा इस्टेट येथे घडला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसलीम रफीउद्दीन सय्यद आणि मुजाहिद्दीन रफीउद्दीन सय्यद (रा. ड्रीम्स रेसीडेन्सी, येरवडा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी नितीन गणपत लाड (वय-55 रा. ड्रीम रेसीडेन्सी, प्रतिकनगर, येरवडा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी लाड यांचा विश्वास संपादन करुन बँकेने जप्त केलेला फ्लॅट स्वस्तात मिळवून देण्याचे आमिष दाखवले. लाड यांनी आरोपींवर विश्वास ठेवून ऑगस्ट 2017 ते 2019 या कालावधीत वेळेवेळी 34 लाख रुपये दिले. पैसे दिल्यानंतर त्यांनी फ्लॅटची मागणी केली. मात्र, आरोपींनी फ्लॅट देण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंत फिर्यादी यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.30) फिर्याद दिली. लाड यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

get_footer();