आवृत्ती पुणे
← Back to Homepage

तलवारीने वार करून जखमी करणारे चौघे जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 9, 2021

येरवड्यात घडला प्रकार : बोनसमधील रक्कम पार्टीसाठी देण्यास नकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कंपनीकडून मिळालेल्या बोनसपैकी ८ हजार रुपये पार्टीसाठी देण्यास नकार दिल्याने टोळक्याने तरुणावर पालघन, तलवारीने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. ही घटना श्रमिक वसाहत येथील ढबळ समोरील मोकळ्या जागेत ६ नोव्हेबरला पहाटे ४ वाजता घडली.

स्वप्नील भालेराव, अश्पाक सय्यद, रोहित ब्रम्हराक्षे आणि हुजेफ शेख (सर्व रा. श्रमिक वसाहत, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत नागेश सुधाकर कोपे (वय ३०, रा. एकता सोसायटीनगर, विश्रांतवाडी) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी व आरोपी हे ओळखीचे आहेत. फिर्यादी यांना कंपनीकडून बोनस मिळाला होता. हे आरोपींना माहिती झाले. तेव्हा त्यांनी बोनसपैकी ८ हजार रुपये पार्टी करण्यासाठी फिर्यादीकडे मागितले.

त्याला फिर्यादी यांनी नकार दिला. तसेच अशपाक सय्यद याच्याविरुद्ध फिर्यादी यांनी ६ महिन्यांपूर्वी तक्रार दिली होती. त्याचाही आरोपींना राग होता. पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांनी पालघन, तलवार तसेच बांबुने मारहाण करुन फिर्यादी यांना गंभीर जखमी केले. तसेच परिसरात दहशत पसरविली. पोलीस उपनिरीक्षक गुरव तपास करीत आहेत.

get_footer();