आवृत्ती पुणे
← Back to Homepage

तडीपार आरोपीसह दोन आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • May 20, 2023

कार चालकास लुटणाऱ्या चोरीचा पर्दाफाश

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे: आंबेगाव पठार भागातल्या चिंतामणी ज्ञानपीठ जवळ चारचाकी धारकाला तसेच टँकर चालकाला लुटणाऱ्या तिघा जणांना भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक करण्यात आली.

समीर शेख, वय 23, सिद्धार्थ गायकवाड वय 21 दोघेही रा. अण्णाभाऊ साठे नगर यांना अटक करण्यात आली आहे.
सदर फिर्यादी कार थांबवून लघुशंकेसाठी उतरला असताना त्याला लुटल्याची खबर पोलिस अंमलदार अभिनय चौधरी, अवधूत जमदाडे, मितेश चोरमोले यांना मिळाली होती. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या तपास अधिकारी आणि अंमलदारांनी ट्रेझर पाँईट शेजारी असलेल्या नाल्याच्या पुलाजवळ आरोपींना अटक केली. आरोपींनी फिर्यादीला मारहाण करून, शिवीगाळ करत त्याच्याकडील 25 हजार 300 रूपयांनी सोन्याची चेन, मोबाईल फोन आणि रोख रक्कम लुटून नेली. याच आरोपींनी या रस्त्यावरून जाणाऱ्या टँकर चालकाचा दोन हजार रूपये किंमतीचा मोबाईल फोनही लुटला. त्यानंतर दोन्ही फिर्यादींनी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन इथे तक्रार दाखल केली होती. लुटीवेळी दोघांबरोबर एक साथीदारही होता.
आरोपींपैकी सिद्धार्थ गायकवाड हा तडीपार आरोपी आहे. त्याच्याकडून चोरीची २५ हजार ३०० रूपयांची चेन जप्त केली.
सदर कारवाई परिमंडळ 2 च्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार अभिनय चौधरी, अवधुत जमदाडे, सचिन सरपाले, निलेश ढमढेरे, चेतन गोरे, हर्षल शिंदे, सचिन गाडे, मंगेश पवार, धनाजी धोत्रे, अभिजीत जाधव, शैलेश साठे, निलेश खैरमोडे, मितेश चोरमोले, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली.

get_footer();