आवृत्ती पुणे
← Back to Homepage

तलवारीने मारहाण करीत दुचाकीस्वाराला लुटले

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 3, 2021

तिघा अज्ञाताविरोधात गुन्हा : कोंढव्यातील खडी मशीन चौकातील घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मध्यरात्री घरी चाललेल्या दुचाकीस्वाराला अडवून तलवारीने मारहाण करुन लुटल्याचा प्रकार कोंढवा येथील खडी मशीन चौकात घडला. या वेळी दुचाकीस्वाराने प्रतिकार केल्यामुळे त्यांच्या हातावर आणि पायावर तलवारीने वार करण्यात आले.

दीनेश जितलाल यादव (३२, रा. टिळेकरनगर, कोंढवा बुद्रुक) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून तिघा अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ३१ ऑक्टोबरला मध्यरात्री घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कोंढवा बुद्रुक येथील टिळेकरनगरमध्ये राहतात. ते मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात असताना ५ अज्ञात चोरट्याने त्यांच्या दुचाकीसमोर दुचाकी आडवी घालून त्यांना खडी मशीन चौक येथे अडवले. त्यांनी तलवारीचा धाक दाखवून फिर्यादीकडील १० हजार रुपये रोख आणि १७ हजार रुपयांचे २ मोबाइल जबरदस्तीने हिसकावून घेतले. त्या वेळी फिर्यादी यांनी त्यांना विरोध केला असता, तिघांनी तलवारीने फिर्यादी यांच्या हातावर, पायावर मारले. तसेच दुचाकीवरही घाव घातले. कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

get_footer();